‘नरवा, गरवा, घुरवा, बारी; छत्तीसगढ के चार चिन्हारी’ : ग्रामीण पुनरुत्थानाचे छत्तीसगड मॉडेल
छत्तीसगडमधील या अभिनव प्रयोगाचा प्रवर्तक आहे एक उच्चशिक्षित ध्येयवेडा तरुण, प्रदीप शर्मा. बघेलांनी शर्मांच्या सोबतीने पदयात्रा काढली व त्यातून गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या पदयात्रेचे सूत्र होते - ‘नरवा, गरवा, घुरवा, बारी, छत्तीसगढ के चार चिन्हारी’. यातील प्रत्येक घटक गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडला गेला असल्यामुळे ग्रामीण लोकांना हा कार्यक्रम आपला वाटला.......